Saturday, January 23, 2021
Home इतर भारताने फास आवळला; चीनचा 'बायपास' मार्गही बंद

भारताने फास आवळला; चीनचा ‘बायपास’ मार्गही बंद

चीन आणि सीमा लागून असलेल्या इतर सात देशांमधून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक असल्याचं भारताने जाहीर केलं आहे. यासाठी परकीय गुंतवणूक नियमात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर यातून नजर असेल. भारतातील कमकुवत उद्योग वाचवणं हा यामागचा हेतू आहे. पण भारताने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अप्रत्यक्षरित्या चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीलाही परवानगी लागणार आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक भारतात येत असेल, पण त्या संबंधित कंपनीत जर चीनची गुंतवणूक असेल तर त्याला परवानगीची गरज असेल. भारताने चीनच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीविरोधातही फास आवळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | economictimes | livemint | hindustantimes | news18

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी