आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (Petrol) सुरूच आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. २ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९७ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९७.३४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८८.४४ रुपये प्रतिलिटर दर आहे. तसेच राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९०.९३ रुपयर तर डिझेलचे दरसुद्धा ८१.३२ रुपये झाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची चिंता वाढली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | deccanherald | marathi.abplive
Web Title: Petrol And Diesel Rate Hike After Two Days Pause