Friday, August 6, 2021

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा साधला पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लशीची कमतरता लपविण्यासाठी भाजपाने रोज खोटं बोलनं आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता आहे.”

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title: Rahul Gandhi Attacks Modi Government Over Vaccination 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी