Thursday, May 13, 2021

संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय आहे : राहुल गांधी

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्याचे आदेश दिले गेले. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे. ‘भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.’ असं म्हणत त्यांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | ndtv | hindustantimes

Web Title: Rahul Gandhi Said Lockdown In Country Is The One And Only Option

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी