Wednesday, June 16, 2021

ममता बॅनर्जी यांना भेटलो, अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना नाही : राकेश टिकैत

नुकताच भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यात भेट झाली. भेटीमधील प्रमुख मुद्दा हा शेतकरी आंदोलन असा होता. मात्र त्यांच्या या भेटीवरून अनेक वाद होत आहेत. अशातच राकेश टिकैत यांनी “मी ममता बॅनर्जी यांना भेटलो, अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना नाही. मला त्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा व्हिजाची गरज नाही. मी अजून अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेणार आहे.” अशा शब्दांत उत्तर दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६ महिन्यांपासून कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. कोरोना काळात हे आंदोलन काहीसं थांबलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. शेतकरी संघटनेकडून २६ मार्च रोजी ‘काळा दिवस’ (Black Day) साजरा करण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv | freepressjournal

Web Title: Rakesh Tikait says we said opposition country weak

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी