जगातील सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सकाळपासून कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने लस दिली जात असून त्यांना सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी देखील साथ दिली आहे. आपल्याच कंपनीने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस त्यांनी शनिवारी घेतला. आपल्या ट्विटर हँडलवरुन पुनावाला यांनी याचा व्हिडिओ शेअर करत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.abplive
Web Title: Serum Institute Of India Ceo Adar Poonawalla Receives A Shot Of Covishield Vaccine Manufactured By His Company