चीनमधील वुहान येथे करोना व्हायरसचा (Coronavirus) पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर याची चाचपणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अजूनही चीन कडून यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस (WHO) यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
सविस्तर माहितीसाठी :- livemint | channelnewsasia | ANI
Web Title: WHO disappointed China hasn’t granted entry to coronavirus experts