बीड-औरंगाबाद महामार्गावर गेवराई बायपासला भीषण अपघात झाला (Beed Accident) आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. लातूरहून औरंगाबादला जाणाऱ्या आय-२० कारने लेन क्रॉस करून औरंगाबादकडून येणाऱ्या ऑइल टँकरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आय-२०मध्ये असणाऱ्या वचिंतच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | marathi.abplive | tv9marathi
Web Title: Accident On Aurangabad Beed Highway Gevrai 5 People Death