Monday, September 20, 2021

मुंबई पाठोपाठ दिल्लीमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना ताज हॉटेल पुरवणार जेवण

देशामधील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस कामामध्ये व्यस्त आहेत. दिल्लीमध्येही करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने डॉक्टरांचे काम वाढले आहे. याच डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी दिल्लीतील ताज आणि लिला हॉटेलने महत्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपचे मालक असणाऱ्या रतत टाटा यांच्या मालिकच्या इंडिय हॉटेल्स कंपनी अंतर्गत येणाऱ्या ताज हॉटेलने सर्व रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. तसेच मुंबईमध्ये रतन टाटांच्या मालकीच्या असणाऱ्या ताज ग्रुपच्या हॉटेल्सने डॉक्टरांना आणि आरोग्य विभागाच्या कार्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटं वाटली काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी ५०० कोटी आणि टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | abplive | hs.news

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी