पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात देखरेखीसाठी व उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र तीन दिवसांपासून त्यांच्या तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याबद्दलचे निश्चित निदान झाले नव्हते. त्यांना करोना संसर्ग झाल्याचे आज निश्चित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
सविस्तर माहितीसाठी :- saamana | lokmat | freepressjournal