Saturday, January 23, 2021
Home इतर पुण्याच्या येरवडा कारागृहातून पाच कैदी फरार

पुण्याच्या येरवडा कारागृहातून पाच कैदी फरार

पुण्यातील येरवडा कारागृहातून मध्यरात्री पाच कैदी पळून गेले. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगन चव्हाण आणि सनी पिंटो अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींग मधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला. या कैद्यांमध्यव तिघेजण दौंड तालुक्यातील एक जण पुणे शहरातील आणि एक जण हवेली तालुक्यातील रहिवाशी आहेत. याप्रकरणी दौंड, वाकड, आणि हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta

Web Title : Five Prisoners Escape From Yerawada Jail In Pune 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी