बुधवारी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पांडुरंग रायकर (Journalist Pandurang Raykar) (वय 42 वर्षे) या टीव्ही पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना झाल्याची 28 ऑगस्ट रोजी पुष्टी झाली होती. यादरम्यान ते अहमदनगर येथे आपल्या घरी होते. श्वास घेण्यास त्रास जाणवल्यानंतर त्यांना पुण्यात आणले. रायकर पुण्यात रुग्णालयात खेटा मारत राहिले, पण त्यांना कुणीही भरती करून घेतले नाही. अखेरीस त्यांना जंबो तात्पुरत्या रुग्णालयात बेड मिळाला. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta | marathi.abplive
Web Title : Journalist Pandurang Raykar Dies Due To Lack Of Treatment In Pune