पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक विजय मारटकर (Deepak Maratkar) (वय ३६) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | indianexpress | esakal
Web Title: Pune Yuva Sena Leader Deepak Maratkar Murdered In Shukrawar Peth