Sunday, March 7, 2021
Home राजकारण देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, बाळासाहेबांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत शिवसेनेला चिमटे

देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, बाळासाहेबांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत शिवसेनेला चिमटे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. यानिमित्तानं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का? , असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे की, ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!’ तसेच ‘आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !’ असं दुसरं ट्वीटही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat

Web Title: Balasaheb Thackeray Jayanti Devendra Fadnavis Slam To Shivsena Uddhav Thackeray

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी