Sunday, January 24, 2021
Home इतर पश्चिम बंगाल : भाजप आमदाराचा मृतदेह भरबाजारात लटकलेल्या अवस्थेत आढळला

पश्चिम बंगाल : भाजप आमदाराचा मृतदेह भरबाजारात लटकलेल्या अवस्थेत आढळला

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार देबेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा संशयास्पद मृत्यू प्रत्यक्षात खून आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. सोबतच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी यावरून थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात गुंडाराज सुरू असून हे शासन पूर्णपणे फेल ठरले आहे. अशा सरकारला भविष्यात जनता माफ करणार नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देबेंद्र नाथ यांच्या खिशात सुसाइड नोट सापडले असून त्यामध्ये मृत्यूसाठी तीन जणांना जबाबदार धरण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या सविस्तर तपास सुरू आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | zeenews | timesofindia

Web Title : Bjp Mla Debendra Nath Ray Dead Body Found Hanging At Home In West Bengal

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी