Saturday, January 23, 2021
Home इतर “राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयातही तोंडावर आपटणार”- निलेश राणे

“राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयातही तोंडावर आपटणार”- निलेश राणे

कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ‘शेती वाचवा’ या आंदोलनासाठी (Farmer Bill) पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते. परंतु या आंदोलनात शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल मात्र अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, यावरून भाजपा खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा (Rahul Gandhi) साधला आहे.“राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार. कृषी विधेयकाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं,” असं म्हणत निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | maharashtratimes

Web Title: Former Mp Nilesh Rane Taunts Congress Leader Rahul Gandhi Over Agitation Against New Farm Bills

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी