लॉकडाउनच्या काळात येणाऱ्या वाढीव वीज बिलाबाबत (Inflated Electricity Bill) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर ‘अदानी ग्रुप’च्या सीईओनी ‘कृष्णकुंज’ची पायरी चढली. ‘अदानी ग्रुप’चे सीईओ आणि शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | maharashtratimes
Web Title : Inflated Electricity Bill: Adani Ceo Met Mns Chief Raj Thackeray