Monday, April 12, 2021

देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर पुन्हा हल्लाबोल

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून पहिल्या दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) संतापले आणि आम्ही भिकारी नाही आहोत अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. “विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat

Web Title: Maharashtra Assembly Budget Session Bjp Devendra Fadanvis Ncp Ajit Pawar

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी