Tuesday, January 26, 2021
Home इतर 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच केला होता' : निलेश राणे

‘पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच केला होता’ : निलेश राणे

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीवर टीका करणाऱ्या शिवसेनेला माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी उत्तर दिलं आहे. ‘शिवसेना नेहमी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधीवर टीका करते. पण पवारसाहेबांचा गेम कोणी केला असेल तर तो अजितदादा पवारांनीच केला,’ असा टोला नीलेश राणे यांनी हाणला आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारबाबत गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या टीकेला उत्तर देताना नीलेश राणे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. फडणवीसांच्या शपथेवर टीका करता? मग अजितदादा पवार (Ajit Pawar) पहाटे-पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय,’ असा प्रश्न राणेंनी केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | pudhari

Web Title : Nilesh Rane Gives Befitting Reply To Shivsena For Criticising Devendra Fadnavis

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी