Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी मौन सोडले

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी मौन सोडले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे” अशी टीका करणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना चांगलंच महागात पडले आहे. अनेक स्थरातून त्यांच्यावर टीकेचा पाऊस होत आहे. यासर्व प्रकरणावर आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मौन सोडले आहे. “गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, त्यांचं अनेक वेळा डिपॉझिट जप्त केलं गेलं आहे, उगाच कशाला आपण बोलायचं” असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस हे काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात असा फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | pudhari | marathi.abplive

Web Title : Sharad Pawar Reacted Gopichand Padalkar Controversial Statement

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी