Wednesday, June 16, 2021

आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेकडून काँग्रेसला महत्वाचा सल्ला!

राजस्थान मधील काँग्रेसचे महत्वाचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) लवकरच भाजप पक्षात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अद्याप काँग्रेस किंवा खुद्द सचिन पायलट यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. नुकताच उत्तर प्रदेश मधील काँग्रेसचे बडे नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे म्हंटले जात आहे. राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली घडतांना दिसत आहे. या सर्व परिस्थितीवर शिवसेना पक्षाने (Shivsena Congress) काँग्रेसला एक आपुलकीचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, “आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. त्यामुळेच आता पुढील परिस्थिती लक्षात घेता राहुल गांधींना टीम तयार करावीच लागेल.” असा सल्ला सेनेने काँग्रेसला दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | maharashtratimes | loksatta

Web Title: Shiv Sena On Jitin Prasad Joining Bjp, Advises Rahul Gandhi To Form A Strong Team

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी