Wednesday, June 16, 2021

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे जाहीर कौतुक!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जून २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील होते. या भेटीचा मुख्य हेतू मराठा आरक्षण असा असला तरीही अजून बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यानंतर अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी वन टू वन चर्चा केली अशी माहिती खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. मात्र, या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. “नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title: Shivsena Sanjay Raut Pm Narendra Modi

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी