Monday, April 12, 2021

अर्जुन तेंडुलकरवर टीका करणाऱ्यांना ‘सारा’ने दिले सडेतोड उत्तर

नुकताच म्हणजे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी IPL 2021 साठीचा लिलाव पार पडला. त्या लिलावात अर्जुन तेंडुलकर याला मुंबईच्या संघाने २० लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. अनेक मोठे खेळाडूंवर बोली लागली नाही पण अर्जुनला मुंबईने विकत घेतलं. त्यामुळे अर्जुनवर टीका करण्यात आली. केवळ वडिलांच्या नावावर त्याला संधी मिळाली असल्याचे बोलले गेले. पण त्याच्यावरील साऱ्या टीकेला त्याची बहिण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने सणसणीत उत्तर दिलं. साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर तिने एक कॅप्शन लिहीत टीकाकारांना उत्तर दिलं. “तुला IPLमध्ये जे स्थान आणि संधी मिळाली आहे ती केवळ तुझ्या स्वत:च्या मेहनतीच्या बळावर मिळाली आहे. याचं श्रेय कोणीही तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे”, अस साराने फोटोवर लिहिलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | abplive

Web Title: Arjun Tendulkar Sold To Mumbai Indians Ipl 2021 Auction Sara Tendulkar Gives Befitting Reply To Criticism

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी