टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितचा जन्म नागपूरच्या बनसोड येथे झाला. रोहित ट्रायलसाठी एक दिवस स्टेडियममध्ये पोहोचला, तेव्हा नेट्समध्ये फलंदाजीसाठी मोठी रांग त्यानं पाहिली. तेव्हा त्यानं गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला आणि ऑफ स्पिन गोलंदाजी केली. त्यात त्याची निवड सुद्धा झाली. २००५ मध्ये श्रीलंका ज्युनियर संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्या सामन्यात रोहितच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याचे गोलंदाज बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला फलंदाज बनण्याचा सल्ला दिला आणि आज जग रोहितला ‘हिटमॅनच्या’ नावाने ओळखते.