Monday, April 12, 2021

मारिया तू बरोबर होतीस, आम्ही सचिनला ओळखत नाही; माफ कर…

देशातील शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) परदेशातील अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सिनेस्टार, खेळाडू आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींनी यासंदर्भात जाहीरपणे मते मांडली होती. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar)चा देखील समावेश होता. पण अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अशातच नेटकऱ्यांनी टेनिसपटू मारिया शारापोवाची (Maria Sharapova) माफी मागितली आहे. मारियाने 2014 साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती. आता एका भारतीय युझरने तिची त्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या युझरच्या मते, आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी… तू बरोबर होती, आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | maharashtratimes | news18 | timesnownews

Web Title: Farmer Protest Netizens Apologise To Sharapova Over Criticism For Not Knowing Sachin Tendulkar

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी