Monday, January 18, 2021
Home इतर अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचं वितरण होण्याआधीच भारतीय क्रीडा जगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने राय यांचं निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. आज राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळणार होता. परंतू आपल्या आयुष्यात हा सन्मान स्विकारण्याआधीच राय यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील आघाडीच्या अ‍ॅथलिट्सना प्रशिक्षण देण्यात पुरुषोत्तम राय यांचा महत्वाचा वाटा आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | hindustantimes | timesofindia

Web Title : Former India Athletic Coach Purushotham Rai Passes Away Hours Before Receiving Dronacharya Award

या लेखकाची अन्य पोस्ट