Friday, February 26, 2021
Home क्रीडा ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर शुबमननं यशाचं श्रेय दिल युवराजला; म्हणाला…

ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर शुबमननं यशाचं श्रेय दिल युवराजला; म्हणाला…

नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक युवा चेहऱ्यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. आज अनेक दिग्गज शुबमनच्या फलंदाजीच्या तंत्राचे कौतुक करत आहेत. शुबमनने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाचे श्रेय युवराज सिंगलाही दिले आहे. आयपीएलच्या आधी २१ दिवसांचे एक शिबीर झाले. त्यात युवराजने शुबमनकडून कसून सराव करुन घेतला. “आयपीएलच्या आधी युवराज सिंग सोबत सराव शिबीरात सहभागी होण्याचा फायदा झाला. या शिबीरात युवराजने वेगवेगळया अँगलमधून शेकडो शॉर्टपीच चेंडू टाकले. त्याचा मला ऑस्ट्रेलियात खूपच फायदा झाला” असे शुबमनने सांगितले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | livehindustan

Web Title: India Vs Australia Shubhman Gill Give Credit To Yuvraj Singh

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी