Monday, April 12, 2021

अशोक दिंडाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघातील आणि बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडानं (Ashok Dinda) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोलकातामध्ये प्रसारमाध्यामांशी बोलताना ही माहिती दिली. त्यासोबतच सर्वांचे आभारही मानले. ३६ वर्षीय दिंडानं १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१९-२० च्या रणजी करंडक क्रिकेट हंगामात फक्त एक सामना खेळल्यामुळे बंगाल क्रिकेट संघटनेकडून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे चालू हंगामाच्या पूर्वार्धात त्यानं गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | cricbuzz

Web Title: Indian Crickter Ashok Dinda Announce Retirement From All Forms Of Cricket

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी