ब्रिस्बेन कसोटी सामन्यााआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह शेवटच्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा दावा बीसीसीआयच्या सुत्रांनी केला आहे. जसप्रीत बुमराह पोटाच्या समस्येने त्रस्त आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, दुसऱ्या डावात बुमराह मैदानातून बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. काही काळाने बुमराह मैदानात परत आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीही केली होती.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | cricketaddictor
Web Title: Indias Pace Spearhead Jasprit Bumrah Ruled Out Of Brisbane Test