क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी या लीगमधील ३१ वा सामना खेळला गेला. काल रॉयल चैलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि किंग्स इलेवन पंजाब (KXIP) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात पंजाबने विराट सेनेवर विजय मिळवला. शारजाह येथील सामन्यात आरसीबीने पंजाबला १७२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र क्रिस गेल (५३) आणि लोकेश राहुलच्या (६१) उत्तम खेळीने पंजाबने ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | loksatta
Web Title: IPL 2020: Kings XI Punjab defeats Royal Challengers Bangalore by 8 wickets