कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच आयपीएल (IPL 2020) सारखी मोठी स्पर्धासुद्धा आधी रद्द करण्यात आली होती. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयचे (BCCI) सुमारे ४ हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता होती. म्हणूनच १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान ही सपर्धा युएईत खेळण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे सध्या सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. अशातच किंग्स इलेवन पंजाबच्या (Kings XI Punjab) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्या बातमीनुसार या पर्वात पंजाब संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खेळाडू के एल राहुलच्या (K L Rahul) खांद्यावर आली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | jagran | newsnationtv
Web Title: IPL 2020: KL Rahul becomes the new captain of Kings XI Punjab