Thursday, May 13, 2021

आयपीएल स्पर्धा स्थगित केल्याने बीसीसीआयचे झाले इतक्या कोटींचे नुकसान

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे देशात आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धा सुरु आहेत. परंतु; नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय कडून संपूर्ण मालिका स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली आहे. आयपीएलच्या स्पर्धा स्थगित झाल्याने बीसीसीआयचं २००० कोटी रुपयांच नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे सामने देखील रद्द होण्याची शक्यता आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | thehindu

Web Title:  Ipl Postponed Bcci Is Likely To Lose Crores

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी