दुबईच्या मैदानावर रंगलेल्या (IPL 2020) दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. मात्र अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील सदोष पंचगिरीसंदर्भात दिग्गजांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब संघाचा मार्गदर्शक असणाऱ्या विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) पाठोपाठ आता पंजाब किंग्स इलेव्हनची मालकीण असणारी अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) हिनेही पंचांनी केलेल्या एका चुकीचा मला सर्वाधिक त्रास झाल्याचे म्हटलं आहे.“(करोनाची) साथ सुरु असतानाही मी उत्साहामध्ये प्रवास करुन इथपर्यंत आले. सहा दिवस क्वारंटाइन राहिले. करोनाच्या पाच चाचण्यांना अगदी हसत हसत सामोरे गेले. मात्र या एका शॉर्ट रनच्या निर्णयामुळे मी दुखावले गेले. तंत्रज्ञान वापरता येत नसेल तर ते काय कामाचे आहे?” असा सवाल तिने केला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | timesofindia
Web Title : ‘It’s time BCCI introduces new rules’: Preity Zinta