Wednesday, January 20, 2021
Home इतर भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग

भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग

लॉकडाउनपश्चात तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी पहिल्या डावात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजीतही हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता अन्य सर्व फलंदाज अपयशी ठरले. सामन्यातील कामगिरीबद्दल बोलत असताना वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डिंग यांनी विश्लेषण केलं आहे. “माझ्या मते भारतीय संघाला अजुनही धोनीची (M S Dhoni) उणीव भासते आहे. यापुढे भारतीय संघाला धावसंख्येचा पाठलाग करणं नेहमी कठीण जाणार आहे. धोनीचा संघात नसल्याचा हा मोठा फटका भारतीय संघाला बसणार आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना मधल्या फळीत येऊन डाव सावरण्याचं कसब धोनीकडे होतं.”

सविस्तर माहितीसाठी :- timesnownews | probatsman

Web Title: Michael Holding reckons Team India is still missing former captain

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी