भारतीय रेल्वे संघाकडून सलग ११ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील अमर पवार (Amar Pawar) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पाश्चत पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते ७१ वर्षांचे होते. मंगळवारी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना कुर्ला येथील आर्यन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि सायंकाळी ५.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीरा चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर माहितीसाठी :- saamana | mymahanagar
Web Title : National Kabaddi Player Amar Pawar Passes Away