Thursday, May 13, 2021

पॅट कमिन्सने पीएम केअर फंडला केलेली मदत आता ‘या’ संस्थेला दिली!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक मोठ्या व्यक्तींकडून मदतीचा हात पुढे आला आहे. अशातच आयपीएल या स्पर्धेसाठी भारतात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सने (Pat Cummins) ५० हजार डॉलर म्हणजेच तब्बल ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याचे ठरवले होते. मात्र आता त्याने ही रक्कम पीएम केअर्स फंडला न देता हा निधी ‘युनिसेफ ऑस्ट्रेलियाला’ या संस्थेला देण्याचे ठरवले आहे. या संस्थेमार्फत भारताला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मदत केली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesnownews | indiatvnews

Web title: Pat Cummins Has Opted To Allocate His Usd 50000 Donation To Unicef

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी