बाॅलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अमेरिकेतही क्रिकेटला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. यातूनच या ठिकाणी आता किंग खानच्या मालकीचा संघ टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. त्याने नुकताच येथील मेजर लीगसाठी आपला एक संघ खरेदी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये किंग खानचा लाॅस एंजलिस नाइट रायडर्स संघ खेळणार आहे. अशा प्रकारे आता त्याचा प्राेफेशनल लीगमध्ये सहभागी हाेणारा तिसरा संघ ठरला. यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी हाेणाऱ्या काेलकाता नाइट रायडर्स आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबागाे नाइट रायडर्सचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याचा तिसरा संघ अमेरिकेतील लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे.
सविस्तर माहितीसाठी :- india | economictimes | crickettimes
Web Title: Shah Rukh Khan Buys Team in USA Cricket League, Names it LA Knight Riders