आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात शार्दुलला (Shardul Thakur) भारतीय संघात स्थान मिळालं. शार्दुलनं या संधीचं सोनं करत गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली चमक दाखवली. गाबा येथील मैदानावर ऐतिहासिक विजायात शार्दुलनं मोलाचा वाटा उचलला. यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या शार्दुल ठाकूरची इंडियन एक्स्प्रेसनं मुलाखत घेतली. या मुलाखतीत शार्दुलनं दिलखुलास उत्तरं दिली. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीचा सामना कसा केला, याबाबत विचारलं असता शार्दुल ठाकूरनं मिश्कील प्रतिक्रिया दिली. दो म्हणाला की, एकवेळ कांगारुंच्या गोलंदाजाचा सामना करणं सोपं आहे. मात्र, लोकलमध्ये सीट मिळणं अवघड आहे. कारण तिथं चांगल्या टियमिंगची गरज असते. शार्दुल ठाकूरनं हे मस्कीरीत उत्तर दिलं आहे.
सविस्तर माहितीसाठी :- tv9marathi | sportsindiashow | m.dailyhunt
Web Title: Shardul Thakur Says Getting A Seat In Local Train Harder Than Facing Fast Bowling