Thursday, May 13, 2021

आयपीएलवर कोरोनाचे सावट : संपूर्ण मालिका स्थगित!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे देशात आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धा सुरु आहेत. परंतु; नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय कडून संपूर्ण मालिका स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली आहे. यापूर्वी कोलकाता आणि बँगलोर संघाचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title: The Entire IPL Season Has Been Postponed Due To Corona

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी