Thursday, May 13, 2021

फिरकीपटू सुनील नरेनला पुत्ररत्न प्राप्ती!

नुकताच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करून तिचे नाव सांगितले. त्यानंतर क्रिकेट विश्वातून अजून एक गोड बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज संघाचा फिरकीपटू सुनील नरेनला (Sunil Narine) पुत्रप्राप्ती झाली आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. “तू आमच्या हृदयातील अशी जागा भरून काढली आहेस ज्या पोकळीची आम्हाला जाणीवही नव्हती. तुझ्या इवलाश्या चेहऱ्यावर आम्हाला देवाची कृपा आणि दया दिसते आहे. तुला आमचं खूप खूप प्रेम मिळो”, असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | yahoo | news18 | timesofindia

Web Title: West Indian Cricketer Sunil Narine And Wife Anjellia Welcome First Child Posts Photo On Instagram

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी